मलकापूर दिनांक 6 – विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरच्या वतीने विदर्भातील जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी 15 वर्षाखालील मुलीसाठी एक महिना कालावधीचे प्रशिक्षण शिबीर सहकार विद्या मंदिर बुलडाणा येथे आयोजीत करण्यात आले होते,या शिबीराचा समारोप दि 5 जून रोजी संपन्न झाला .शिबीरात विदर्भातील 27 खेळाडूंची निवड प्रत्येक जिल्हातील खेळाडूंसाठी निवड चाचणीचे आयोजन करून व्हीसीएच्या सिलेक्टर द्वारे हे खेळाडू निवडण्यात आले होते .या खेळाडूंना शिबीरात शारीरिक क्षमता वाढविणे,तंत्रशुध्द खेळाचे प्रशिक्षण देवून सराव सामने आयोजित करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला .या शिबीरादरम्यान सहकार विद्या मंदीराच्या संचालिका आदरणीय कोमल झंवर यांनी देशातील महिला खेळाडूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढते महत्व लक्षात घेता खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्यावर भर देत उत्तम निवास,भोजन व मैदान व्यवस्था उपलब्ध करून देत वेळोवेळी खेळाडूंना प्रोत्साहन दिले तर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चांडक यांनी जिल्हयातील खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्यासाठी दर्जेदार हिरवळ असलेले मैदान तयार करण्यात येत असल्याची माहिती देत प्रत्येक खेळाडूची व्यवस्थेबाबत आस्थेने विचारपूस केली .शिबीरात खेळाडूंना व्हीसीएचे लेव्हल 2 कोच अमोल खोब्रागडे, लेव्हल 1 कोच विजय चव्हाण व संकेत निंभोरकर यांनी मार्गदर्शन केले तर श्रध्दा भिंगे यांनी केअरटेकर व चंद्रकांत साळुंके यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.हे शिबीर यशस्वी करणेसाठी बुलढाणा जिल्हा क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष किशोर वाकोडे मोहम्मद साबीर इमरान खान व राहुल जाधव यांनी तसेच सहकार विद्यामंदीर तर्फे प्रशासकीय अधीकारी यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती व्हीसीए चे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर वाकोडे यांनी दिली