खामगाव :- तालुक्यातील खुटपुरी येथील एका २१ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. जय गजानन गवळी असे मृत युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी जय गवळी हा मालवाहू ट्रक आणण्यासाठी बुलढाणा येथे जात असल्याचे सांगून सकाळी १० वाजता घराबाहेर पडला. दुपारी गावातील मित्रांना भेटून शेतात गेला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या आईने त्याचा मित्र राजेश प्रल्हाद गवळी याला शेतात जयला शोधायला पाठविले. त्यावेळी त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
रात्री घरी न आलेल्या मित्राला पाहायला शेतात गेला, अन् शेतात मित्र झाडाला..खामगाव तालुक्यातील घटना
