मलकापूर :- मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचालित हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम दि.18 जुलै रोजी संपन्न झाला जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग बुलढाणा यांच्यातर्फे शाळेत राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील श्री आर. जी .पाखरे आरोग्य निरीक्षक , डी एल जोशी,जी एल सुपे, व्ही ए पवार आरोग्य सेवक, उपस्थित होते. विद्यार्थिनींना रोगप्रसारक डास व त्याची उत्पत्ती, डेंग्यू चुकून गुनिया, हत्तीरोग ,मलेरिया, या रोगांची लक्षणे ,प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे वैयक्तिक व परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे, परिसरात डबकी असल्यास बुजविणे, पाणी साठे झाकून ठेवणे, मच्छरदाणीचा उपयोग करणे ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे याविषयी माहिती देण्यात आली. डेंग्यू सारख्या रोगावर निश्चित असा औषध उपचार नसल्यामुळे तसेच हा रोग जीवघेणा असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हाच एक योग्य मार्ग आहे त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे म्हणूनच विद्यार्थ्यांमार्फत ही माहिती घराघरात पोहोचावी या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यत येत आहे प्रतिपादन अधिकारी वर्गाने केले. विविध रोगप्रसारक डासांचे चित्र, डासांच्या अळ्या, गप्पी गप्पी मासे नमुने विद्यार्थिनींना दाखविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या सौ ममताताई पांडे पर्यवेक्षिका सौ खडसे, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.