मलकापूर : भारत पे वरून ९५ हजार रूपयांचे माझ्या नावाने लोन घेऊन एटेल पेमेंट बँकेचे खाते उघडून फसवणूक केल्याप्रकरणी सावरगाव नेहू येथील शिवाजी दिनकर लांजुळकर यांनी नांदुरा पो. स्टे. ला तक्रार दाखल केली आहे.दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, माझे सावरगाव येथे जय गजानन प्रोव्हीजन दुकान असून माझ्या दुकानावर भारत पे कडून क्यु आर कोड बसविण्यात आलेला आहे. त्या भारत पे चे कर्मचारी ८ ते १० दिवसात येत असतात. त्यावेळी त्यांनी तुमचा केवायसी करायचा आहे, तुमचा भारत पे क्यु आर कोड बंद पडेल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून फॉर्म भरून माझी सही घेतली वत्यांना मी माझे विविध कागदपत्रे दिली. त्यानंतर काही दिवसांनी मी माझ्या खातेउतारा चेक केला असता माझ्या खात्यातून ९५ हजाराच्या लोनसह किमान १८ ते २० हजार रूपयांची कमी झाल्याचे दिसून आले.त्यामुळे माझ्या नावावर मला माहित नसतांना व माझी दिशाभूल करून एटेल पेमेंट करून घेतले अशी तक्रार नांदुरा पोस्टेत दिली आहे.
म्हणे तुमचा क्यू आर कोड बंद पडेल, फॉर्मवर सह्या घेऊन सावरगाव नेहूच्या दुकानदाराची 95 हजारांनी फसवणूक
