शेगाव : शेतातील विहिरीत पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सवर्णा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. सवर्णा येथील अभिजीत संजय इंगळे (वय १९) हा युवक शौचास गेला होता. मात्र, तो उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली. पण तो कोठेही दिसून आला नाही.अभिजीत हा विहिरीमध्ये पडला असावा म्हणून गावातील नागरिकांनी गळ टाकून पाहिले असता तो विहिरीमध्ये पडल्याचे दिसून आले. या प्रकरणी भारत भगवान इंगळे यांच्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.