मलकापूर- मलकापूर शहरात दिनांक 21 सप्टेंबर रोजी केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा. ना. प्रतापराव जाधव आणि केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण मंत्री भारत सरकार मा. ना. रक्षाताई खडसे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्याबद्दल करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. संतोष शेकोकार, इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख प्रा. योगेश सुशीर, तसेच प्रा. जयप्रकाश सोनोने आणि प्राध्यापिका तेजल खर्चे, प्रा. मंजिरी करांडे, प्रा. माधुरी राजपूत, प्रा. शिवानी बोंडे, प्रा. स्नेहल पवार आणि प्रा. ऋतुजा पाटील यांनी मंत्र्यांचा आदरपूर्वक सत्कार केला.
या सत्कार समारंभादरम्यान, डॉ. युगेश खर्चे यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची माहिती मंत्र्यांना सविस्तर दिली. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न व त्यातून मिळालेले यश विशेष मुद्द्यांसह मांडले. त्याचबरोबर, महाविद्यालयाला स्वायत्ततेच्या दिशेने जलद गतीने कसे पुढे नेता येईल, यावर मंत्र्यांशी चर्चा केली. या संवादादरम्यान, स्वायत्तता मिळाल्यानंतर महाविद्यालयाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कसा मिळवता येईल, यावरही सखोल विचारमंथन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मलकापूर शहरातील विविध मान्यवर, विद्यार्थी, पालक, आणि शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे कार्यक्रमाला भव्यतेचा रंग चढला. शहरातील विविध घटकांच्या उपस्थितीत, हा सत्कार सोहळा एक संस्मरणीय क्षण ठरला आहे.
केंद्रीय मंत्र्यांनीही मलकापूर शहराच्या विकासाबद्दल व महाविद्यालयाच्या शैक्षणिक यशाबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून मिळणार्या सहाय्याची हमी दिली आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणे कशा पद्धतीने प्रभावी ठरतील याबाबत सल्ला दिला.