Headlines

कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्युत विभागाची येलदरी जलविद्युत प्रकल्पाला विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

 

मलकापूर : – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग (पॉलीटेक्निक) तर्फे द्वितीय व तृतीय वर्षातील ७५ विद्यार्थ्यांनी जिंतूर येथील येलदरी जलविद्युत प्रकल्पाला शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना जलविद्युत निर्मिती प्रक्रिया, टर्बाईन व जनरेटर्सचे कार्य, प्रकल्पातील सुरक्षा उपाययोजना व दस्तऐवजीकरण तसेच प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, प्रा. संदीप खाचणे, विभागप्रमुख प्रा. जे. डी. सोनोने तसेच यांचे मार्गदर्शन लाभले. इलेक्ट्रिकल विभागातील प्रा. मनोज वानखडे, प्रा. पी. पी. गावंडे व प्रा. सृष्टी बोचरे यांनी भेट यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.

विद्यार्थ्यांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी महाजेनको एल्दारी जलविद्युत प्रकल्प, जिंतूर येथील कार्यकारी अभियंता मा. श्री. जांबुतकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. भेट यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रा. पी. एस. ठाकरे यांनी इनचार्ज म्हणून कार्यभार सांभाळला.

या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकलेल्या ज्ञानाची औद्योगिक पातळीवरील प्रत्यक्ष जोड मिळाली असून भविष्यातील व्यावसायिक कारकिर्दीसाठी त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वृद्धिंगत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!