मोताळा:- महावितरणच्या मोताळा मंडळांतर्गत कार्यरत वायरमनचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना आज, 17 मे रोजी तालुक्यातील मूर्ती येथे घडली. गुणवंत विश्वनाथ सांगवे असे या वायरमनचे नाव आहे. आज दुपारी मूर्ती या गावातील एका विद्युत खांबावर चढून गुणवंत सांगवे दुरुस्तीचे काम करत होते.यावेळी त्यांना उच्च दाबाचा धक्का लागला. त्यामुळे ते खांबावरून दूरवर फेकल्या गेले. ग्रामस्थांनी माहिती देताच महावितरणचे – अधिकारी, कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अत्यवस्थ स्थितीत गुणवंत – सांगवे यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी, 16 मे रोजी सायंकाळी तालुक्यात अनेक ठिकाणी – वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे मूर्तीसह अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे महावितरण च्या मोताळा कार्यालयात तक्रार देण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन महावितरणने आज सकाळपासून दुरुस्तीची मोहीम सुरू केली. या दरम्यान गुणवंत सांगवे हे मूर्ती येथे दुरुस्तीचे काम करत असताना ही दुर्घटना घडली.