आलेगाव : घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे भाचीला खोट्या प्रतिष्ठेपायी जिवे मारण्याच्या इराद्याने (ऑनर किलिंग) जंगलात घेऊन जात असलेल्या तीच्या दोन मामा व आजीला रोखले असता त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांच्यावर हल्ला केला. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळडोळीदरम्यान रस्त्यावर घडली. या घटनेनंतर मुलीच्या आजीसह दोन्ही मामांविरोधात चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन्ही मामांना ताब्यात घेतले आहे. नवेगाव येथील एका मुलाचे गावापासून जवळच असलेल्या एका गावातील मुलीवर प्रेम होते. तीन महिन्यांपूर्वी दोघेही गाव सोडून गेले व नवेगातमध्ये लग्न करून परतल्याची माहिती मुलीच्या नातेवाइकांना समजल्यानंतर त्यांनी नवेगाव येथील त्या मुलाचे घर गाठले. तेथून जबरदस्ती मुलीला घेऊन जायला निघाले. परंतु याबाबत मुलाच्या नातेवाइकांनी आलेगाव पोलिस चौकीला माहिती दिली व मुलीसोबत काही बरे- वाईट होण्याची शंका व्यक्त केली. या माहितीवरून पोलिस कॉन्स्टेबल उमेश सांगळे तेथे पोहचेल त्यावर हल्ल्याचा मुलीच्या म्हणण्यानुसार तिचे नातेवाईक तिला जंगलामध्ये मारण्याकरिता नेत होते. याबाबत माहिती मिळताच आमचे पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.