Headlines

सकाळी झालेल्या बस अपघातातील तीन जणांची प्रकृती बिघडली ; बुलढाणा हलवले

मलकापूर: मलकापूर तालुक्यातील तांदुळवाडी नजीक ओव्हरटेक करणाऱ्या वाहणाऱ्या वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी होऊन अपघात झाला या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 29 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुमारास फौजी धाब्याजवळ घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव आगाराची बस क्रमांक एम.एच 40 वाय. 5576 खामगाव वरून शिर्डी कडे प्रवासी घेऊन निघाली. ही बस मलकापूर वर आल्यानंतर तालुक्यातील काही प्रवासी या बस मध्ये बसले. बस मलकापूर स्थानकावरून निघाली. मलकापूर येथून काही अंतरावर असलेल्या तांदूळवाडी फाट्या नजीक फौजी धाब्याजवळ एका वाहनाने गाडीला ओव्हरटेक केला व कट मारून पुढे निघाले मात्र याच वाहनाला वाचण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाने जोरात ब्रेक दाबले बस जागेवरच थांबून दुभाजकावर पलटी झाली. या बस मध्ये एकूण 35 प्रवासी होते. या अपघातात 08 प्रवासी किरकोळ जखमी झाले तर 08 प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातातील जखमींना स्थानिकांनी एसटी बसचे काच फोडून बाहेर काढले. या मधील 8 प्रवासी 1 ) शरद बारसू झोपे रा.तळणी ( 2 ) गोविंद भास्कर नारखेडे रा. बोराखेडी, 3 ) वर्षा माधव भारंबे, रा.नरवेल ) 4 ) मंदा पंजाबराव देशमुख,रा.वसाळी खुर्द तालुका नांदुरा ) 5 ) माधव नारायण भारंबे, रा.नरवेल ता. मलकापूर, 6 )वैष्णवी पंजाबराव देशमुख रा. वसाळी खुर्द तालुका नांदुरा 7) शोभा परमेश्वर पांडे राहणार पैसोडा, 8) रचना प्रभाकर वले राहणार कुऱ्हा काकोडा हे अपघातात जखमी झाले. बस अपघातातील जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होता मात्र या मधील 3 प्रवासी गोविंद भास्कर नारखेडे, माधव नारायण भारंबे व मंदा पंजाबराव देशमुख यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत आता पर्यंत कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *