शेगाव :- शेगावच्या गौलखेड रोडवरील पवनपुत्र नगर येथील एका महिलेच्या घरी २० नोव्हेंबर रोजी दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन तिच्या आणि तिच्या मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार, अकोला येथील रहिवासी अमोल मच्छिंद्र बढे आणि दोन अन्य व्यक्ती महिलेच्या घरी आले, तिला शिवीगाळ केली आणि तिच्या कुटुंबाला जीवाने मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी, त्यांनी महिलेच्या दोन मुलांना अपहरण करण्याची धमकी दिली.
फिर्यादी सौ. प्रतीक्षा योगेश पुरी यांनी याबाबत शेगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम २९६, ३५१(२), ३(५) आणि भा न्यासंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ संजय करूटले हे करत आहेत.