मलकापूर :- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील छ. शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य अशा सार्वजनिक कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छ. शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक कावड यात्रेचे हे 13 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र धूपेश्वर येथील पूर्ण नदीचे जल घेऊन जवळपास एक हजार कावड धारी आपली तब्बल दोनशे फूट लांबीची कावड घेऊन तसेच वेगवेगळे देखावे सादर करीत मलकापूर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य दिव्य अशी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून हर हर महादेवाचा जयघोष करून आपला आनंद व्यक्त करीत असतात. भव्य दिव्य अशा निघालेल्या कावड यात्रेचे मलकापूर शहरात ठीक ठिकाणी हार व फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत करण्यात आले होते. मिरवणुकीनंतर
मलकापूर शहरातील गंगेश्वर मंदिर संस्थान येथील स्थापन शिवलिंगावर आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. सार्वजनिक कावड यात्रेचे छ. शिवाजी नगर मित्र मंडळ
यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. तर मलकापूर शहरात निघालेल्या तब्बल दोनशे फूट लांबीच्या भव्य दिव्य अशा कावड यात्रेने शहरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते.