मोताळा : तालुक्यातील शेलापूर येथील एका ३५ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. सनी बारसू मोरे (वय ३५) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शेलापूर शिवारातील भाडगनी या ठिकाणी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला असून, याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सुपडाशिंह चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू आहे.
शेलापूर येथील युवकाची आत्महत्या विष प्राशन करून आयुष्य संपवले; कारण अद्याप गुलदस्त्यात
