Headlines

लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा बदल विवाहित महिलांना दिलासा

( वृतसंस्था )मुंबई:- एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण करण्यात आले. राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे ठरले. त्यानुसार, योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी, शर्तीमध्ये बदल करून शिथिलता करण्यात आली आहे.

नवीन नियम, अटी व शर्ती

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.

२. एखाद्या महिलेचा परराज्यात जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केल्यास त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे

३. ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून त्यात बदल करावा लागणार आहे.

४. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.

५. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर, त्या महिलेच्या पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राहय धरावे.

६. ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!