बुलढाणा :- शहरातील कारंजा चौकामध्ये एका जणाकडून २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाकाबंदीदरम्यान बुलडाणा शहर पोलिसांनी एका स्कुटी चालकाची तपासणी केली. त्याच्याकडे २० लाख मोठी रक्कम मिळून आली.
स्कुटी चालक आणि रोख रक्कम बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र कोचर असून तो अडत व्यापारी असल्याचे समजते. २० लाख रुपयांची कॅश घेऊन आपण चिखली येथे व्यापाऱ्याकडे जात होतो, अशी कबुली कोचर यांनी दिली आहे. दरम्यान, २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची वाहतूक करण्यास मनाई असल्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले. हे प्रकरण निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाकडे सोपवण्यात आले आहे.