जलंब – शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ४ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अमित आळशी यांच्या घरातून एकूण ५ लाख ६५ हजारांचे दागिने व रोकड चोरली. तसेच विठ्ठल गाडे, गजानन कानडे व विष्णू फूटवाईक यांच्या घरांमधून मिळून ७९ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध BNS कलम ३३१, ३०५ (A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सुनील देव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.