शेगाव :- शेगावमध्ये २८ वर्षीय विवाहितेने दोन लाख रुपयांच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दिली आहे. विवाहितेने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिच्या पतीसह पाच जणांनी संगनमत करून तिला हुंड्यासाठी मारहाण केली, शिवीगाळ केली, तसेच तिला घराच्या बाहेर हाकलून दिले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहिता सौ. ज्योती गोपाल संबारे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, आरोपींमध्ये पती गोपाल गुलाबराव संबारे, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांचा समावेश आहे.यावरून, शहर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.