मलकापूर : परंपरा, संस्कृती आणि आनंदाचा संगम घडवणारा नवरात्र उत्सव नूतन इंग्लिश स्कूलमध्ये उत्साह-उत्सवात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दांडिया व गरबा नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगतदार कलात्मक छटा दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य श्री. सुरेश खर्चे व उपप्राचार्य यांच्या हस्ते देवीची प्रतिमा तसेच देवींच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थिनींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरणातून नवरात्र उत्सवाचे सौंदर्य खुलवले. शाळेतील शिक्षिका सौ. सचिता वर्मा यांनी नवरात्र उत्सवाचे महत्त्व, सामाजिक ऐक्याचा संदेश आणि भारतीय संस्कृती जपण्याची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या जल्लोषमय उत्सवात विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.