राहुरी :- सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून राज्यात आचार सहिंता सुरु आहे.
राहुरी तालुका तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत.
त्यामुळे पोलीस प्रशासन सध्या ॲक्शन मोड वर आहे.
अशातच उंबरे तालुका राहुरी येथील माळवाडी चारी लगत जुगारीचा तिरट नावाचा खेळ सुरु असल्याची माहिती राहुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच पोलीस हेड.कॉ.नदीम शेख,सुरज गायकवाड, सतीश कुऱ्हाडे, राहुल यादव ह्यांना खात्रीशीर बातमी मिळाली असता त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.
पोलीस स्टेशन च्या डायरीत नोंद करु न दोन पंचा समक्ष त्यांनी उंबरे येथे दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी माळवाडी चारी लगत छापा टाकला असता तिथे त्यांना गोलाकार बेसून तिरट नावाचा हार जीत या हेतूने जुगार खेळताना काही इसम आढळून आले.
तात्काळ पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य, 5 अँड्रॉइड मोबाईल तसेच एक इलेक्ट्रिक वाहन तसेच एक बजाज कंपनीची पल्सर दुचाकी व जुगारी साठी वापरली जाणारी रोख रक्कम असा एकूण 1लाख 56 हजार 890 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा 12 (अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या वृत्तपत्र नुसार जुगार चालवणारा साहेबराव गेनू गायकवाड वय वर्ष 38 राहणार उंबरे माळवाडी तालुका राहुरी यांच्या सह इतर 6 जुगार शौकिन ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ह्यांच्या मार्गदर्शना खाली पो. हे. कॉ. प्रमोद ढाकणे, नदीम शेख, राहुल यादव सुरज गायकवाड राहुरी पोलीस पथकाने केली आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार साहेबराव गेनू गायकवाड गायकवाड हा उंबरे ग्रामपंचायत माळवाडी चा विद्यमान सदस्य आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे काम असते आपल्या वार्डात विकास करणे, विविध योजना राबवणे, योजनेसाठी पाठपुरावा करणे आणि असा ग्रामपंचायत सदस्यचं जर आपल्या आपल्या राहत्या घरी परिसरात जुगारीचा खेळ मांडत असेल तर ही मोठी शोकांतिका असून गावचा पोलीस पाटील, सरपंच ह्या कडे का डोळे झाक करत होते हे न समजण्याजोगी गोष्ट आहे.
जनता अशा लोकांना निवडून कसाकाय देते ही शरमेची बाब आहे.
जर पदाधिकारी अवैध धंदे चालवत असतील व ते कुणाच्या आशीर्वादा मुळे सुरु असतील तर हे खेदजनक आहे.