मोताळा (जि. बुलढाणा) : नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीला जेवण बनविले नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोसिंग येथील रहिवासी आशाबाई बाबुराव शेगर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पतीने, बाबुराव नाना शेगर यांनी, दारू पिऊन घरी येत जेवणाच्या कारणावरून वाद निर्माण केला आणि आशाबाईला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर बाबुरावने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर मारहाण केली. या घटनेत आशाबाईच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. तसेच, पतीने “जेवण न दिल्यास जीवे ठार मारण्याची” धमकी दिली, अशी तक्रार आशाबाईंनी दिली आहे.
या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१ (२) अंतर्गत बाबुराव शेगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.