मलकापुर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम संताजी नगर येथील श्रीकृष्ण मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता बाल – महिला भजनी मंडळ वडगाव तिघे ता. जामनेर येथील भजनी मंडळांने भगवान श्रीकृष्ण यांच्या महंतीपर भजने सादर केली तद्नंतर जन्म अध्याय घेण्यात आला, देवाला गंध, अक्षदा,विडा अर्पण करून महाआरती करण्यात आली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संताजी नगर येथील बालगोपालांनी सहभाग घेऊन दहीहंडीचा कार्यक्रम पार पाडला. दि.28 ऑगस्ट बुधवार महंत भीष्माचार्य बाबा जाळीचा देव, महंत गोमेराज बाबा, महंत आवेराज बाबा, महंत जनार्दन बाबा, महंत विराट बाबा यांच्या पुजनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकोडीचे सरपंच शुभम काजळे, शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी, शिवसेना (उ.बा.ठा) शहरप्रमुख तथा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, ॲड संजय वानखेडे यांच्यासह संताजी नगर वासी आणि पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त, बंधु, भगिनी हजर होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी संताजी नगर वासीयांसह सोपानराव हिवाळे, पांडुरंग कोल्हे, डॉ.राजपूत उल्हास संबारे ,वैभव संबारे, भरत पाटील, धोरण, डॉ. मोहन तायडे, पुरुषोत्तम बोंबटकार, प्रभाकर गावंडे, सुरज राजपूत, एकनाथ बोरसे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले