Headlines

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तेरा जणांवर गुन्हा, दीड लाखांचा ऐवज जप्त

वृतसंस्था

मुक्ताईनगर : तालुक्यातून जाणाऱ्या मुक्ताईनगर ते ब-हाणपूर महामार्गावर टोलनाक्याजवळ पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावरील टोलनाक्याच्या परिसरात अनेक जुगार अड्डे असून, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर फारशी कठोर कारवाई होत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. या अनुषंगाने बुधवारी, ७ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलिसांना टोल नाक्याजवळ साईराज ढाब्याच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी काही जुगारी हे जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पत्त्यांच्या कॅटसह रोख रक्कम व अन्य सामग्रीसह सुमारे १ लाख ४७ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात शांताराम जीवराम मंगळकर (रा. लाल रेल्वे स्थानकाजवळ, बऱ्हाणपूर), गणेश वसंत पाटील (रा. पुरनाड, ता. मुक्ताईनगर), महेंद्र बापूराव नाईक (रा. जुने गाव, मुक्ताईनगर), युवराज संतोष महाजन (रा. निंभोरासीम, ता. रावेर), सुनील किसन बेलदार (रा. कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर), राजेश सीताराम वाकोडे (रा. नांदुरा, जि. बुलडाणा) आणि जागा मालक आणि अन्य सहा अनोळखी संशयित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे व पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सावे, राजेश महाजन, विशाल पवार, संतोषकुमार भारूडे, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *