खामगाव :- तालुक्यातील निपाणा येथे ३० वर्षीय महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, १० नोव्हेंबर रोजी ती तिच्या आईला दवाखान्यातून घरी घेऊन जात असताना बुध्दविहारासमोर तिच्या भावासोबत बोलत असताना गावातील गजानन अजाबराव अंभोरे आणि कैलास आत्माराम गावंडे यांनी गैरवर्तन केले. तसेच तिच्याशी अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन अजाबराव अंभोरे व कैलास आत्माराम गावंडे यांच्या विरुद्ध कलम ७४, ७५, २९६, ३ (५) ३५१(२) भारतीय दंड संहितेनुसार तसेच अनुसूचित जाती जमाती अपराध प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.