डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची नियुक्ती

पुणे : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी “डोंगरचा राजा” चे संपादक अनिल_वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस_एम_देशमुख यांनी काल पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली..

डिजिटल मिडियात काम करणारया पत्रकारांची डिजिटल मिडिया परिषद या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.. डिजिटल मिडियाची स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे.. त्यानुसार काही पदांच्या नियुक्तया जाहीर करण्यात आल्या आहेत.. डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बीडचे जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील माय मराठी 24 तास या वाहिनीचे संपादक संतोष_उर्फ_सनी_शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी शेगाव येथील पत्रकार #अनिल_उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे..इतर पदांच्या नेमणुका लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत ..
कार्यकारिणी सदस्य म्हणून माथेरानमधील महाराष्ट्र न्यूज 24 तासचे संपादक मल्हार संतोष पवार, बीड येथील वास्तव अपडेटचे संपादक जितेंद्र शिरसाट, डिबीसी न्यूज चंदगडचे संपादक अनिल नयनसुख धुपदाळ, नगर येथील न्यूज टू डे 24 चे संपादक अल्ताफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. 11 जणांची ही कार्यकारिणी असेल.. उर्वरित सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल असे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे..
डिजिटल मिडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारित असेल.. ही कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेला उत्तरदायी असेल असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे..
नवनिर्वाचित पदाधिकारयांचे एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे…

Leave a Comment

error: Content is protected !!