खामगाव : – गिरोली शिवारातील शेताच्या बांधावरून सुरू झालेला वाद दोन्ही गटांत मारहाणीपर्यंत गेला असून, या प्रकरणात उत्तम राठोड व संजय चव्हाण या दोघांनी एकमेकांविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १ जून रोजी घडली. उत्तम मंगो राठोड (५५) यांच्या फिर्यादीनुसार, ते व त्यांच्या पत्नी शेतात असताना दीपक चव्हाण, संजय चव्हाण, ताराचंद चव्हाण व नैतिक चव्हाण यांनी मातीच्या वादातून शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केली. पत्नीलाही काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, संजय महादेव चव्हाण (४५) यांच्या फिर्यादीनुसार, पाण्याच्या नालीसाठी जागा मागितली असता उत्तम राठोड व नितीन राठोड यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तसेच सुनंदा राठोड यांनीही धमकी दिल्याचा आरोप केला आहे. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल असून तपास एएसआय गजानन सातव करत आहेत.
गिरोली शिवारात बांधावरील वाद पेटला; दोन्ही गटांमध्ये हाणामारी.. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल!
