मलकापूर: महाराष्ट्रातील संत परंपरेमधील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार व गोसेवक, विदर्भ रत्न हरिभक्तिपरायण रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक कार्य संचालनानया तर्फे देण्यात येणारा मानाचा वारकरी संप्रदायातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार “ज्ञानोबा तुकाराम” सन २०२४ हा प्राप्त झालेला आहे, त्यानिमित्ताने मलकापूर, नांदुरा तालुक्याच्या वतीने समस्त वारकरी संप्रदाय मलकापूर यांच्यातर्फे महाराजांचा सत्कार समारंभ श्री क्षेत्र धूपेश्वर संस्थान हरसोडा तालुका मलकापूर येथे बुधवार दि.१८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेवर ठेवण्यात आलेला आहे.या कार्येशक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष प.पू.महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज फैजपूर तर प्रमुख उपस्थिती मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर व वारकरी संप्रदायातील जेष्ठ व श्रेष्ठ मंडळीची राहिल.तरी वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वारकरी संप्रदाय मलकापूर नांदुरा यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. श्री हरिभक्तिपरायण संजय महाराज पाचपोर यांचे कार्य खूप मोठे आहे त्यांच्या कार्याचा आढावा खालील प्रमाणे आहे.
अनेक जीर्ण मंदिरांचा जीर्णद्धार करणारे, आपल्या रामायण कथेने लाखो भाविकांना मंत्रमुग्ध करणारे, गोरक्षक, गुरुवर्य आदरणीय ह भ प बाबांची साधना ,वारकरी संप्रदायासाठी चे योगदान, आध्यात्मिक समाज बांधणीचे कर्तृत्व, आध्यत्मिक प्रबोधन ,गोरक्षण, बाल संस्कार शिकवण व आदर्श युवा पिढी निर्मिती साठी ची धावपळ, सातपुड्याच्या पायथ्याशी स्थित वनवासी गरीब कुटुंबाच्या उन्नती साठी परिवर्तनाचा ध्यास असे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे आमचे, आपले गुरुवर्य बाबा, त्या सर्वांची फलश्रुती म्हणजे संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार व बाबांच्या भूषणावह कर्तृत्वाचा ,सेवा भावी कार्याचा ,अमृततुल्य वाणी चा हा गौरव आहे.तरी या संपूर्ण सोहळ्यात राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या तमाम भाविकांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन मलकापूर-नांदुरा तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.