खामगावः छताचा पंखा उधारीवर न दिल्याच्या संतापातून एकाने मारहाण केल्याची घटना हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत लाखनवाडा येथे बु. येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, पवन भागवत उमाळे हा लाखनवाडा बु. येथील दुकानात होता. त्यावेळी प्रकाश उर्फ बालू सुरेश देशमुख हा दुकानात आला. त्याने पंखा उधारीवर मागितला. त्यावेळी पवन याने पंखा देण्यास नकार दिला. त्यावरून प्रकाश देशमुख याने पवनला मारहाण केली. तर नकुल उर्फ गोलू प्रकाश देशमुख याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अहवालावरून हिवरखेड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास हिवरखेड पोलिस ठाण्याचे स. फौ. आनंदा वाघमारे करीत आहेत.
उधारी पंखा न दिल्याने मारहाण, दोघांवर गुन्हा! लाखनवाडा येथील घटना
