Headlines

खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून मिळवले वारसा प्रमाणपत्र; मलकापूरात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मलकापूर : – सहदिवाणी न्यायालयात खोटा प्रतिज्ञापत्र सादर करून फसवणूक करत वारसा प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी करण्यात आली असून, संजय नारायण सुलताने, मनोज नारायण सुलताने (दोघे रा. मलकापूर) आणि संतोष नारायण सुलताने (रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपींनी १३/२०२२ या प्रकरणांतर्गत न्यायालयात अर्ज सादर करताना, अन्य वारसांची नावे लपवली व खोटा प्रतिज्ञापत्र तसेच खोट्या साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाचा आदेश मिळवला. या फसवणुकीचा पर्दाफाश एम.जे.सी. क्र. ५३/२०२४ मध्ये झाला. तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले की, पूर्वी दाखल असलेल्या अर्जाचा उल्लेखही नव्याने दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात करण्यात आलेला नव्हता. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच सहदिवाणी न्यायाधीश एस. एम. अहेर यांनी तात्काळ फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक अधीक्षक अरविंद पंढरीनाथ बेलूकर यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन कौळासे हे पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!