कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल,मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील घटना!

मलकापूर : कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्याने मुलांच्या फोटोला कवटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील बेलाड येथे बुधवार, २ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. प्रविण निवृत्ती संभारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळी त्यांनी मुलांचे फोटो हृदयाला कवटाळलेल्या स्थितीत होते. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मलकापूर शहर पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा केला. प्रविण संभारे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा आप्तपरिवार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!