मलकापूर: ज्ञानोबा -तुकोबा पुरस्कार हा सेनापतींचा नाही तर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील सैनिकांचा आहे.धार्मिक काम करणाऱ्यांना आनंद झाला हि बाब गहिवरून आणणारी आहे.जिवन जगत असतांना प्रत्येकाने प्रापंचीकता, सामाजिकतेबर धार्मिकता कर्तव्य म्हणूनच पार पाडली पाहिजे असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी केले.
राज्य शासनाच्या यंदाच्या ज्ञानोबा -तुकोबा पुरस्काराचे मानकरी रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर ठरले आहेत.त्या निमित्ताने मलकापूर – नांदुरा तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने धोपेश्वर येथील संस्थानच्या सभागृहात आज बुधवारी सत्कार सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना संजय महाराज बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू.महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज होते.प्रमुख उपस्थिती मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे,ह.भ.प.वासुदेव महाराज शास्त्री,ह.भ.प.पुंजाजी महाराज, धोपेश्वर संस्थानचे अध्यक्ष अँड महादेवसिंह रावळ यांची होती.यावेळी पुढे बोलताना संजय महाराज यांनी त्यांच्या जिवनात धार्मिक व सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या प्रेरणांचा उहापोह केला.
या कार्यक्रमात आ.राजेश एकडे, माजी आमदार चैनसुख संचेती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपूरे,जि.प.च्या माजी अध्यक्षा उमा तायडे,उपाध्यक्ष मंगला रायपूरे, शिवराय प्रतिष्ठानचे सचिव अँड साहेबराव मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह दामोदर लखाणी,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सचिन तायडे पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर शर्मा, समतेचे निळे वादळ संघटना अध्यक्ष भाई अशांत वानखेडे त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या वतीने ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प.पू.विठ्ठल लहरी बाबांना अभिवादन करण्यात आले.यावेळी ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे,ह.भ.प.संभाजी महाराज शिर्के,ह.भ.प.रामभाऊ महाराज झामरे यांनी समायोजित विचार व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात ह.भ.प.स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी देव बनता आले नाही तरी चालेल पण किमान देवाचा माणूस बनून प्रत्येकाने सेवा दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.सोहळ्याचे प्रास्ताविक ह.भ.प.शिवाजी महाराज झामरे यांनी केले.सूत्रसंचालन ह.भ.प.नितीन महाराज अहिर यांनी तर आभारप्रदर्शन स्वागताध्यक्ष संतोषराव रायपूरे यांनी केले.पसायदानाने या दिमाखदार सोहळ्याची सांगता करण्यात आली.