मलकापूर :- शहरातील एका अट्टल गुन्हेगाराने शेजाऱ्यांशी वाद केला, या वादाची माहिती पोलिसांना मिळताच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र अट्टल गुन्हेगार घटनास्थळावरून पसार होऊन झाडाझुडपात लपला. मात्र पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले व अटल गुन्हेगार हा झाडाझुडपात लपलेला असल्याचे, पोलिसांच्या निदर्शनास पडताच त्या अट्टल गुन्हेगाराने तलवार घेऊन डीपी पथकातील एका अधिकाऱ्यावर तलवारीने जोरदार वार केला मात्र डी.बी. पथकातील त्या अधिकाऱ्याने तो वार चुकविला व आत्मसंरक्षणासाठी त्यांनी दोन राउंड हवेत गोळीबार केला तर एक राऊंड अट्टल गुन्हेगारांच्या पायावरती लगावला मात्र तो राउंड त्यांचा चुकला व अट्टल गुन्हेगार अंधाराचा फायदा घेत तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना काल दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील म्हाडा कॉलनीत घडली. घटनास्थळी नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी भेट दिली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलं असून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ३१ ऑगस्ट रोजी १०.३० च्या सुमारास पोलीस स्टेशनला माहीती मिळाली की, मनोजसींग सिकंदरसींग टाक रा. म्हाडा कॉलनी हा म्हाडा कॉलनी येथे आला असुन त्याचे शेजारी राहणा-या लोकांना मारहाण करीत आहे. सपोनि वर्गे यांनी तात्काळ सदरबाबत वरीष्ठांना माहीती देवुन म्हाडा कॉलनी येथे पोलीस अधिकारी/अंमलदार व इतर पोलीस स्टाफ यांचेसह रवाना झाले. तेथे पोलीसांनी मनोजींग सिकंदरसीग टाक याचा शोध घेतला परंतु तो तेथे दिसला नाही. वरुन पोलीस त्याचे पत्नी व आई यांना मनोजसींग बाबत विचारपुस करत असतांना आरोपी मनोजसींग टाक हा बाजुचे झाडाझुडपातुन धावत आला. त्याचे हातात धारदार शस्त्र लोखंडी तलवार होती. व तो धावत येवुन त्याने पोउपनि सुनिल घुसळे यांचेवर तलवारने वार केला. परंतु सदर वार त्यांनी हुकविला त्यानंतर नमुद आरोपी हा इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर हल्ला करण्यासाठी धावला. त्यावेळी सपोनि. वर्गे यांनी सोबत असलेले शस्त्रधारी पोकॉ. शुभम ठाकरे यांना पोलीसांचा जिव वाचविण्याच दृष्टीने त्यास हवेत फायर करणेबाबत सांगीतले. म्हणुन दोन गोळ्या फायर केल्या. तथापी आरोपी नामे मनोजसींग टाक हा आणखी चवताळून पोलीसांचे मागे तलवार घेवुन धावला म्हणुन सपोनि वर्गे यांनी आरोपीचे दिशेने फायर करण्यास सांगीतले वरुन पोकॉ. शुभम ठाकरे यांनी तीसरा फायर आरोपीचे दिशेने केला. परंतु आरोपीने सदरचा वार चुकवुन अंधराचा फायदा घेवुन आरोपी बाजुचे झाडाझुडपात पसार झाला. त्यानंतर घटनास्थळी म्हाडा कॉलनी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी व आरसीपी पथकासह येवुन फरार आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी मनोजसिंग हा मिळुन आला नाही. आरोपी नामे हा मनोजसींग टाक हा पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथील कुख्यात आरोपी असुन त्याचेवर पोस्टे मलकापुर शहर येथे मालमत्ता चोरीचे, शरीरीविरुध्दचे तसेच शस्त्र अधिनियम अन्वये बरेच गुन्हे दाखल आहेत. व नमुद आरोपी 08 गुन्हयामध्ये पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपी मानोजसिंग विरुध्द 05 ते 06 जिल्हयांमध्ये विवध कलमांखाली गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी पोउपनि सुनिल घुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुख्यात आरोपी मनोजसींग विरूद्ध अप नं. 434/2024 कलम 109, 132, 125, 121 (1), 231 BNS सह कलम 4,25 आर्म अॅक्ट 3,25 अॅक्ट प्रमाणे पोस्टे मलकापुर शहर यथे गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस करीत आहे.
बुलढाणा जिल्हयात नव्यानेच रुजु झालेले पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी आज रोजी सकाळी सदरच्या घटनास्थळी भेट दिली. व नमुद फरार आरोपीचा शोध व गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन केले. आरोपी शोध करीता विशेष पथके नेमण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे.