नांदुरा :- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने दारूबंदी व जुगार कायदयातंर्गत कारवाई करत ७१ हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एका विरूध्द १६ ऑक्टोबर रोजी कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा पो.स्टे. हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करीत असतांना डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नवीन पातोंडा येथील अजय पुणाजी रणीत (वय ३० वर्ष) रा. नवीन पातोंडा ता. नांदुरा हा अवैधरित्या विनापरवाना मोटार सायकलवर वाहतूक करून विक्री करण्याचे उद्देशाने मोटार सायकलवर एका थैलीमध्ये १८० एमएल मापाच्या १० नग विदेशी दारूच्या शिशा घेवून जात आहे. सदर माहितीवरून इसमास थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे थैलीसह १९२० रु. विदेशी दारू व एक मोटार सायकल बजाज पल्सर कंपनीची क्र. एमएच १२ टीजे १९८२ किं. ७०,००० रु. असा एकूण ७१,९२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पोहेका मिलिंद जवंजाळ, अनंता वराडे, नापोका राहुल ससाने, पोका विनोद भोजने, विनायक मानकर, सुनील सपकाळ, योगेश निंबोळकर, रवि झगरे यांनी केली. सदर आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन नांदुरा येथे दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोहेका अनंता वराडे करीत आहेत.