नांदुरा : तालुक्यातील निमगाव येथील १९ वर्षीय युवती साक्षी पुंडलिक खैरे ही २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दवाखान्यात जाण्याच्या कारणाने घरातून बाहेर पडली. मात्र ती घरी परतली नाही, अशी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी २८ डिसेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.साक्षीचा रंग गोरा, उंची ५ फूट, सडपातळ बांधा असून, ती दवाखान्यात जाताना पिवळ्या रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची लॅगीन, व विटकरी रंगाच्या सॅडल घातलेली होती. तिचे काळे केस आहेत, असे वडिलांनी दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. अशा वर्णनाची युवती आढळल्यास चौकशी अधिकारी पोलीस हवालदार इंगळे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.