Headlines

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त अजित कॉन्व्हेन्ट, चांदूर बिस्वा येथे विविध विद्यार्थीभिमुख कार्यक्रम संपन्न..

 

नांदुरा :- 22 डिसेंबर National Mathematics Day म्हणजेच ‘राष्ट्रीय गणित दिवस’ हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मदिवस ‘गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त नी फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जे बरेच फायद्याचे ठरतात.
विद्यार्थी या शब्दाचा अर्थच मुळी ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे व जो जिज्ञासू आहे असा होतो .प्रत्येक व्यक्ती हा जीवनात अगदी जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थी असतो. म्हणूनच सरिताताई यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी अजित कॉन्व्हेन्ट, चांदूर बिस्वा येथे गणित दिनानिमित्त गणितोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्येची देवता देवी शारदा तसेच प्रेरणास्रोत स्व. शेषरावजी इंगळे यांच्यासह गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांची ‘गणिताशी मैत्री’ म्हणून निरनिराळ्या ॲक्टिव्हिटी, गणितीय खेळ घेण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांनी गणित सोप्या पद्धतीने समजावे यासाठी निरनिराळे गणितीय मॉडेल बनविण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.सरिताताई बावस्कार यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे महत्व या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व उपक्रमांचे परीक्षण केले.या गणितोत्सवामधे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!