धामणगाव बढे : – दुचाकीवर आलेल्या दोघांनी ऑटोचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ६,२०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना सोमवार, ८ एप्रिल रोजी पहाटे सावरगाव मार्गावर घडली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास नारायण जैस्वाल (रा. शिवाजीनगर, मलकापूर) हे प्रवासी घेऊन ऑटोरिक्षाने सावरगावकडे जात असताना अचानक दुचाकीने आलेल्या दोघांनी रस्त्यात अडवले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.