मलकापूर :- केंद्रिय कृषी मंत्रालय भारत सरकार ,SFAC ( लघु कृषक व्यापार संघ ) अंतर्गत CBBO कृषी विकास व ग्रामीण संस्थेच्या च्या माध्यमातून कार्यरत असलेल्या मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोडुसर कंपनीच्या अध्यक्ष सौ.ज्योत्सना प्रशांत तळोले व त्यांच्या संपूर्ण सहकारी संचालकांनी शेतमालाचे मूल्यवर्धन ,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दाखल घेत प्रशांत तळोले सौ.ज्योत्सना तळोले ,भास्कर पाटील ,सौ.वनमाला पाटील ,विलास खर्चे ,सौ.संगीता खर्चे,निलेश तांदुळकर,सौ.माधुरी तांदुळकर,संजय फिरके ,सौ.सीमा फिरके ,निनाजी चौधरी सौ.किर्तीमाला चौधरी यांचेसह एकूण 20 लोकांना येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात अतिथी म्हणून दिनांक १४ ऑगस्ट ते दिनांक १६ ऑगस्ट पर्यंत उपस्थित राहण्याबद्दल निमंत्रण प्राप्त झाले आहे .
दिनांक १४ ऑगस्ट रोजी हे सर्व लोक दिल्ली येथे दाखल होत असून कृषी मंत्री व SFAC च्या अधिकारी यांचेसोबत बैठक होणार आहे.
केंद्र सरकार द्वारा राबविण्यात असलेल्या मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेला एस एफ ए सी द्वारे 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी च्या निर्मिती आणि प्रोत्साहनासाठी केंद्रीय क्षेत्र योजने च्या माध्यमातून मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोडुसर कंपनीची स्थापना करण्यात आलेली असून कंपनीचे कामकाज चालू आहे.
केंद्र सरकार मार्फत लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात अतिथी म्हणून मिळालेले बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर ला हे विशेष निमंत्रण शेतकरी बांधवांसाठी अभिमानाची व ऐतिहासिक बाब ठरली आहे.
फार्मर प्रोडुसर कंपनीच्या माध्यमातून तेलवर्गीय पिकाची मूल्य साखळी तयार करून मलकापूर च्या कृषी विकासाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.स्वतः उद्योग करून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा,तसेच २०२४ -२०२५ मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन च्या कार्यक्रमाला कृषी विभागाच्या माध्यमातून मलकापूरात सुरुवात केलेली असून संपूर्ण मलकापूर परिसरात नैसर्गिक शेतीचा प्रयोग यशस्वी करण्याचा मनोदय त्यांनी या वेळी व्यक्त केला.
“`माझे कुटुंबीय व सर्व सहकारी यांच्या सहकार्याने तसेच एस एफ ए सी व सीबीबीओ कृषी विकास संस्था यांचे मिळणारे प्रोत्साहन यामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन करणे ,बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करणे शक्य झाले – सौ.ज्योत्सना तळोले