उमेश ईटणारे
मलकापूर :- लोणवडी दुधलगाव रस्त्यावर बिबट्या दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ एका कार चालकाने आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी मोबाईल मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करून बिबट्याचा व्हिडिओ खरा असल्याचे सांगीतले आहे. दि. 26 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक चार चाकी वाहन चालक लोणवडी दुधलगाव रस्त्याने जात होता. त्या दरम्यान त्याला रस्त्याच्या मधोमध बिबट्याचे पिल्लू दिसून आले. पिल्लाला घेण्यासाठी बिबट्या रस्त्यावर येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान वाहन चालकाने लाईट बंद केल्यानंतर बिबट्याने पिल्लाला घेऊन झाडाझुडपामध्ये निघून गेला,त्यानंतर वाहन चालकाने आपले वाहन पुढे घेऊन निघाला असे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान रस्त्यावर बिबट्या दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.