मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दहीहंडी उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी घिर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः दहीहंडी व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले .व नंतर पारंपारिक वाद्य ढोल -ताशे व लेझीम पथकासह शाळेतील विद्यार्थ्यां – विद्यार्थिनींनी “हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल “की च्या गजरात संपूर्ण घिर्णी नगरी दुमदुमून गेली . या मिरवणुकीमध्ये गावातील मुलां -मुलांनी श्री .अमोल चोपडे सरांसोबत शिस्तप्रिय पद्धतीत लेझीम पथक आकर्षक ठरले .व शेवटी श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समोर दहीहंडी बांधून कृष्णाच्या वेशभूषेतील नैतिक बगाडे या मुलाने केलेल्या मनोऱ्यावर चढून फोडली .या कार्यक्रमाला दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष श्री .अमोल चोपडे सर,उपाध्यक्ष ॲड. दिलीप बगाडे, सदस्य गणेश बगाडे श्रीकृष्ण सुशीर , प्रमोद बगाडे उमराव सिंग चव्हाण दिनकर गव्हाळे बाबुराव इंगळे जयपाल सिंग चव्हाण मनोज बगाडे अमोल बगाडे गोपाल चोपडे संजय भोपळे जानराव वनारे जयपाल सिंग चव्हाण नकुल चोपडे दिनकर धोरण रामधन बोपले मंगल परमार तसेच गावातील पदाधिकारी व असंख्य नागरिक – महिला वर्ग व बालगोपाल सहभागी होते शेवटी गोपाल काला प्रसाद वाटप करून दहीहंडीची सांगता करण्यात आली .अशा प्रकारची माहिती पत्रकार सुधाकर तायडे यांनी दिली .