Headlines

खामखेड येथे विहिरीत आढळला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; मलकापुरातून दोन दिवसांपासून होते बेपत्ता..

 

मलकापूर :- येथील दुर्गानगर परिसरातील ४५ वर्षीय पुरुषाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव किशोर रतन पाटील असे असून, ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खांदेश येथे राहणारे व सध्या दुर्गानगर, मलकापूर येथे वास्तव्यास असलेले किशोर पाटील २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही ते आढळले नाहीत. आज (२७ फेब्रुवारी) खामखेड गावातील प्रशांत जानराव पाटील यांच्या गोठ्यानजीक असलेल्या विहिरीत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. प्राथमिक तपासात मृतदेह हा किशोर पाटील यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएस १९४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!