कृ.उ.बा.स. सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव १३ विरुद्ध २ मताने मंजूर..

 

मलकापूर (प्रतिनिधी) : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाजपचे शिवचंद्र तायडे यांचे विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रचंड गदारोळात १३ विरुद्ध २ मताने शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या विशेष सभेच्या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तरीही प्रचंड गदारोळात दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले होते त्यामुळे प्रचंड नारेबाजी लाठीचार्ज दगडफेक पळापळ यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता मलकापूर बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात २० मे रोजी अविश्वास ठरावाची मागणी केली होती आज विशेष सभा आयोजित करण्यात आली होती माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला संचेती गटाला १३ संचालकांनी पाठिंबा दिला तर तायडे यांच्या बाजूने २ संचालक होते अत्यंत तणावपूर्वक वातावरणात दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोन्ही समर्थकांकडून नारेबाजी करण्यात आली होती.यावेळी दगडफेक पळापळ व जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या सभेचे कामकाज मलकापूर येथील तहसीलदार राहुल तायडे, यांच्या अध्यक्षते खाली नायब तहसीलदार गोतकर, सहायक निबंधकक महेश कृपलानी यांनी पाहिले

Leave a Comment

error: Content is protected !!