निरंकारी मिशनच्या वतीने नांदुरा व मलकापुर मध्ये ‘वननेस वन’ परियोजनेच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन! मलकापूर व नांदुरा मधील स्वयंसेवक करणार वृक्षारोपण..

 

मलकापुर (प्रतिनिधी)  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि पूज्य निरंकारी राजपिताजी यांचे दिव्य मार्गदर्शन व पावन आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने सन् 2021 मध्ये ‘वननेस वन’ नामक मेगा वृक्षारोपण परियोजना सुरु करण्यात आली. या परियोजनेचे लक्ष्य ‘समूह वृक्षारोपण’ (लघु वन) करुन त्याची देखभाल करणे हा होता. परिणामी आता दरवर्षी याचे स्वरूप विस्तारत चालले आहे.

संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजाजी यांनी माहिती देताना सांगितले, की सन् 2021 मध्ये आयोजित ‘वननेस वन’ परियोजनेच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण भारतात सुमारे दिड लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. ज्या उत्साहाने निरंकारी भक्तांनी या वृक्षांचे रोपण केले त्याच उत्साहाने वर्षभर त्यांची देखभाल केली. परिणामी या ‘वृक्ष समूहांचा’ इतका विस्तार झाला आहे, की ते आता एक ‘लघु वनाचे’ रुप प्रदर्शित करत आहेत. या ‘वृक्ष समूहांकडे प्रवासी आकर्षित होत असून त्यांच्यावर दुर्लभ प्रजातीचे पक्षी पहायला मिळत आहेत, ज्यांचे अस्तित्व जवळपास संपत आले होते. नि:संदेह प्रकृतीचा समतोल कायम ठेवण्यात या समस्त जीवांचे फार महत्व आहे.

सन् 2022 मध्ये देखील ‘वननेस वन’ परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले ज्यामध्ये वृक्षांची संख्या 2 लाखापर्यंत पोहचली. त्यानंतर दरवर्षी ही संख्या वाढत असून आजवर जवळपास 2.50 लाख वृक्षांचे रोपण केले गेले आहे. या वृक्षांची सातत्याने मोठ्या तल्लीनतेने देखभालही केली जात आहे. मिशनच्या सेवादारांकडून या वृक्षांचे संगोपन ज्या त्या ठिकाणच्या वातावरणानुसार व भौगोलिक परिस्थितीनुसार केले जात आहे. त्यासाठी उत्तम जैविक खते, स्वच्छ पाणी व सिंचनाच्या आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे.

समाज कल्याणासाठी आवश्यक अशा या परियोजनेला क्रियान्वित ठेवण्यासाठी संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनमार्फत ग्रामीण व शहरी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये आणखी नवनवीन ठिकाणांचा समावेश करुन या महाअभियानाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ रविवारी 11 ऑगस्ट रोजी *नांदुरा येथे सरकारी दवाखान्याच्या परिसरामध्ये* तसेच संपूर्ण भारतवर्षातील 600 हून अधिक ठिकाणी ‘विशाल वृक्षारोपण अभियान’ रुपात केला जात आहे. यामध्ये मिशनचे समस्त अनुयायी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होऊन जवळपास 10 लाख वृक्षांची लागवड करतील आणि आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत तीन ते पाच वर्षांपर्यंत देखभाल करतील ज्यायोगे आधीच्या टप्प्यांप्रमाणेच हे वृक्षारोपण ‘लघु वनाच्या’ रुपात प्रफुल्लीत होऊ शकेल.  

वर्ष 2020 मध्ये कोरोना संकटाने आपल्या सर्वांनाच प्रकृतीची अनमोल देणगी प्राणवायू म्हणजेच ऑक्सीजनचे महत्व समजावले ज्यासाठी या वृक्षांचे अस्तित्व अतिआवश्यक आहे. कारण या वृक्षांची संख्या वाढल्याने केवळ आसपासच्या वातावरणाचा प्रदूषणापासून बचाव होईल इतकेच नव्हे तर स्थानिक तापमानदेखील नियंत्रणात राहील. निरंकारी मिशन वेळोवेळी अशा कल्याणकारी योजना कार्यान्वित करुन ‘पर्यावरण संरक्षण’ व धरतीला सावरण्यामध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!