Headlines

“चहा पेक्षा कॅटली गरम” अन आ. राजेश एकडे यांचा करेक्ट कार्यक्रम! कसा झाला पराभव.. वाचा सविस्तर बातमी

 

मलकापूर( दिपक इटणारे ) 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन पाच वेळा आमदार असलेल्या चैनसुख संचेती यांचा दणदणीत पराभव करून राजेश एकडे यांनी मोठा विजय मिळवला होता. मात्र, त्या विजयाने आलेला अहंकार आणि ओव्हरकॉन्फिडन्स त्यांच्या राजकीय वाटचालीत अडथळा ठरला. 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडेल अशी चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी हरीश रावळ यांनी आपला अर्ज मागे घेतला, ज्यामुळे राजेश एकडे यांना आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास वाटू लागला. कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधण्याऐवजी स्वतःच्या अहंकारामुळे त्यांना दूर ठेवले. “चहा पेक्षा कॅटली गरम” अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एकडे हे चांगले लोकप्रतिनिधी असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आडमुठ्या वागण्यामुळे लोक नाराज होते. त्याचा परिणाम असा झाला की माजी आमदार चैनसुख संचेती यांनी 26,397 मतांनी दणदणीत विजय मिळवत राजेश एकडे यांचा पराभव केला. ही निवडणूक फक्त राजकीय लढाई नसून, कार्यकर्त्यांच्या वर्तनाचा जनतेने घेतलेला बदला होता. राजेश एकडे यांना सामान्य जनतेशी थेट संवाद साधण्याची गरज आहे, अन्यथा त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला गंभीर अडचणी येऊ शकतात.

*राजेश एकडे यांच्या पराभवाचा फटका: अहंकार, कार्यकर्त्यांचा दुराग्रह आणि जनतेशी तुटलेला संवाद*

2019 विधानसभेच्या निवडणुकीत पाच वेळा आमदार राहिलेल्या चैनसुख संचेती यांना 14,000 मतांनी पराभूत करत आमदार राजेश एकडे यांनी विजय मिळवला होता. तो विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. मात्र, त्या विजयाने आलेला अहंकार आणि कार्यकर्त्यांच्या अतिरेकाने 2024 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

*हरीश रावळ यांची बंडखोरी आणि उमेदवारी मागे घेण्याचा प्रसंग*

2024 च्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याचे बोलले जात होते. ही फूट माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करेल, असा कयास होता. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने शेवटच्या क्षणी रावळ यांची समजूत काढून त्यांचा अर्ज मागे घेतला.

हरीश रावळ यांनी उमेदवारी मागे घेतल्याने राजेश एकडे अधिक आत्मविश्वासात आले. “बोटावर मोजणाऱ्या समाजाच्या पाठिंब्यावर मी सहज जिंकणार,” असा विश्वास त्यांनी दाखवला. मात्र, हा आत्मविश्वास काही काळानंतर ओव्हरकॉन्फिडन्समध्ये बदलला.

कार्यकर्त्यांचा अतिरेक आणि जनतेशी तुटलेला संपर्क

राजेश एकडे यांच्या पराभवामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांचा अहंकार. एकडे यांच्या कार्यकर्त्यांनी सामान्य मतदारांना जवळ करण्याऐवजी त्यांना दूर लोटले. समस्या घेऊन आलेल्या लोकांची ऐकण्याऐवजी त्यांना वागणुकीत अपमानित केले जाऊ लागले. “चहा पेक्षा कॅटली गरम” ही म्हण या कार्यकर्त्यांसाठी सार्थ ठरली.
सामान्य जनतेशी संपर्क तुटल्याने लोकांचा रोष वाढला. कामांसाठी तक्रारी घेऊन येणाऱ्या मतदारांपर्यंत एकडे यांची गाठ पडत नव्हती. यामुळे मतदारांनी आपला संताप मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केला.

*चैनसुख संचेतींचा विजयरथ आणि राजेश एकडे यांचा पराभव*

संजेती यांनी या निवडणुकीत 26,397 मतांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय केवळ एका निवडणुकीचा निकाल नव्हता, तर जनतेने राजेश एकडे यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला धडा होता. संचेती यांनी या विजयासह पुन्हा आपली राजकीय ताकद सिद्ध केली.

*पराभवातून धडा घ्यायची वेळ*

राजेश एकडे यांच्यासाठी हा पराभव जागृतीचा धक्का असला पाहिजे. चांगले नेतृत्व असतानाही जनतेशी तुटलेला संवाद आणि कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे हा पराभव ओढवला. जर त्यांनी हा पराभव गांभीर्याने घेतला नाही, तर भविष्यात त्यांची राजकीय कारकीर्द आणखी कठीण होऊ शकते.

जनतेने एक संदेश स्पष्ट दिला आहे – नेत्याने केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर सतत लोकांशी संपर्क ठेवायला हवा, नाहीतर ‘लोकशाहीचा खरा राजा’ आपली ताकद दाखवायला विसरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!