मलकापूर:- लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान आज सुरू आहे. देशातील ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये रावेर मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदार संघात 55.36% टक्के मतदान झाले ची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
रावेर लोकसभाच्या मलकापूर मतदारसंघांमध्ये सकाळच्या सुमारास रिमझिम पावसाचा सावट होता. या मतदात्यांनी मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी सकाळीच गर्दी केली होती. तर सकाळी अकरा पर्यंत मलकापुरात 20.85 टक्के मतदान झाले. मात्र दुपारी थोडा काही उन्हाचा पारा चढल्याने मतदानाकरिता असलेला उत्साह दुपारी मात्र मावळल्या चित्र मलकापूर लोकसभा मतदारसंघात बघायला मिळाला. दुपारी एक वाजेपर्यंत 33% मतदान झाले. दुपारी तीन वाजता 48.67 मतदान झाले तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 59.10% मतदान झाले.
04 रावेर लोकसभा मतदारसंघ -55.36 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
10 चोपडा विधानसभा मतदारसंघ –55.99 %
11 रावेर विधानसभा मतदारसंघ –56.85%
12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ –52.70 %
19 जामनेर विधानसभा मतदारसंघ –54.63 %
20 मुक्ताईनगर Programs मतदारसंघ –53.20 %
21 मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 59.10 %