Headlines

मलकापूर मतदारसंघात अँड. हरीश रावळांच्या भूमिकेवर लक्ष: निवडणूक लढविणार की माघार घेणार?

मलकापूर:-  (उमेश इटणारे )येथे सध्या अँड. हरीश रावळ यांच्या भूमिकेबाबत मोठी उत्सुकता आहे. २०१९ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यानंतर रावळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आता काँग्रेसकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, ज्यामुळे काँग्रेसमध्ये चिंता वाढली आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे योगदान आणि त्यांनी केलेली आंदोलने पाहता, पक्षाने त्यांना अपेक्षित संधी दिली असती, तर निवडणुकीत पक्षाला बळ मिळाले असते.

रावळ यांच्या उमेदवारीमुळे मलकापूरमध्ये काँग्रेसची मतविभाजनाची भीती निर्माण झाली आहे, जेथे भाजपसाठी ही गोष्ट फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे काँग्रेसमधील वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत की रावळ यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास राजी करावे.
आज (४ नोव्हेंबर) ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून, रावळ यांचा निर्णय येत्या काही तासांत समोर येणार आहे. काँग्रेसच्या गडात निर्माण झालेली ही अस्थिरता, पक्षासाठी नवी संकटे निर्माण करू शकते. रावळ यांनी अपक्ष म्हणून लढल्यास निवडणुकीत मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काँग्रेसला धोका आहे. रावळ यांच्या निर्णयाचा काँग्रेसच्या मतदारांवर काय परिणाम होईल, हे त्यांच्या अंतिम भूमिकेनंतर स्पष्ट होईल. राजकीय वातावरणात उष्णता वाढवत असलेल्या या घडामोडी भविष्यातील मलकापूरच्या राजकारणात निर्णायक ठरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *