Headlines

क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण दाताळ्यातील डिईएस हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल!

मलकापूर: बसमध्ये चढल्यावर क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.या घटनेत जखमी मुलाच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आज रविवारी सायंकाळी दाताळ्यातील डिईएस हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे पिंपळखुटा बु.. येथील अविनाश चंद्रशेखर मालठाणे हा विद्यार्थी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मलकापूर -निमखेड बसमध्ये घरी जाण्यासाठी चढला होता.दाताळा बसस्थानकावरच त्याचा त्याच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला.
थोड्या वेळात त्या वादाच पर्यायासन हाणामारीत झाले.त्यात इतर विद्यार्थ्यांनी उडी घेतली व पाहता पाहता अविनाश चंद्रशेखर मालठाणे या विद्यार्थ्यांला फायटर ने डोक्यात मारहाण केली.व पोटावर व पाठीवर देखील काहींनी मारहाण केली.त्यात तो जखमी झाला होता.हा प्रकार गावातील गावकऱ्यांनी बघीतल्याचे त्याचबरोबर हा प्रकार ग्रामपंचायतीच्या सिसीटिव्हीत कैद झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जखमी विद्यार्थ्याचे काका किरण रामेश्वर मालठाणे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी डिईएस हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९१(२), १९० अन्वये रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका भगवान सुरडकर करीत आहेत.

विद्यार्थ्यांचा वाद नित्याचाच

तालुकास्तरीय मौजे दाताळा येथील डिईएस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वेगवेगळ्या गावातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. यात विद्यार्थ्यांमधील वाद नित्याचेच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नावाजलेल्या या संस्थेने वाद निसटण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादीत होत आहे.पोलीस व शाळा व्यवस्थापनाच्या संयुक्त विद्यमाने उपाययोजनांची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *