Headlines

विघ्ननिर्मात्या डॉक्टरची व भावाची नामांकित डॉक्टर व पत्रकारांकडे मध्यस्थी करण्याची भीक; म्हणे मला माझी चूक कबूल, पण रुग्णांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून मी असं बोललोच नसून बुळाखालील अंधार लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न!

 

 

मलकापूर (दिपक इटणारे): रुग्णसेवा ही पवित्र भावना, पण येथे मात्र सेवेच्या नावाखाली पैशांचा व अहंकाराचा नाच, अशी सत्यदर्शी बातमी विदर्भ लाईव्ह ने प्रकाशित केली आणि मलकापूरात खळबळ माजली. या बातमीने रुग्णसेवेच्या नावाखाली विघ्ननिर्माता बनलेल्या एका बालरोगतज्ज्ञाचा बुळाखालील अंधार प्रकाशात आणला. मात्र सत्य न पटल्याने आता तोच डॉक्टर आणि त्याचा भाऊ सत्य लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. या प्रकरणानंतर डॉक्टरच्या भावाने वैचारिक नव्हे तर अरेरावीचा मार्ग निवडला. पत्रकारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत तो उर्मट भाषेत बोलू लागला. पण पत्रकारानेही ठणकावून उत्तर दिलं आणि त्याच क्षणी विघ्ननिर्मात्याचा अहंकारी भाऊ शेपूट घालून पळाला.
विदर्भ लाईव्ह सत्य बोलतं, पारदर्शकतेने वागतो आणि अशा विघ्ननिर्मात्यांना घाबरत नाही, अशी भूमिका संपादक दिपक इटणारे यांनी स्पष्ट केली. जर सत्य लिहिणं गुन्हा असेल, तर विदर्भ लाईव्ह असे शंभर गुन्हे करायला तयार आहे. असा ठाम संदेश त्यांनी दिला. दरम्यान या बातमीच्या प्रसिद्धीनंतर आपलं नुकसान होऊ नये म्हणून तोच डॉक्टर आता आपल्या वर्तनाचं समर्थन करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज दाखवून सफाई देतो आहे.
आम्ही महिलेशी काहीच बोललो नाही, असा दावा तो हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखवतो आहे. पण सत्य लपवण्याच्या या प्रयत्नांमुळेच नागरिकांमध्ये आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. जर काहीच घडलं नव्हतं तर मग मध्यस्थीची भीक का मागितली? कारण विदर्भ लाईव्ह ला मिळालेल्या ठोस माहितीनुसार, या डॉक्टरने शहरातील काही नामांकित डॉक्टरांकडे जाऊन माझ्याकडून आणि माझ्या भावाकडून चूक झाली, कृपया मध्यस्थी करा अशी विनंती केली होती. एवढंच नव्हे, तर त्याच्या भावाने काही पत्रकारांनाही भेटून प्रकरण मिटवूया अशी मागणी केली होती. म्हणजेच एका बाजूला मी काहीच बोललो नाही अशी सफाई आणि दुसऱ्या बाजूला माफ करा चूक झाली असं कबुलीचं वर्तन हेच या विघ्ननिर्मात्याचं दुहेरी चेहऱ्याच दर्शन आहे. रुग्णसेवेच्या मंदिरात मानवतेऐवजी अहंकाराचं राज्य आणि सत्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न हे समाजासाठी लाजिरवाणं चित्र आहे. विदर्भ लाईव्ह मात्र अशा बागडबिल्ल्यांच्या दडपशाहीला न जुमानता सत्य उजेडात आणण्याचं कार्य सातत्याने करत राहील. अंधार कितीही दाटला तरी सत्याचा प्रकाश विझवता येत नाही, हे या प्रकरणातून पुन्हा सिद्ध झालं आहे. विघ्नहर्ता नावाचं फलक असलं तरी कृतीने तो विघ्ननिर्माता ठरला आहे. आता त्याच्या बुळाखालील अंधार झाकण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरत आहेत आणि तो अंधार आणखीनच प्रकाशात येणार हे नक्की!

विघ्न निर्माता भाग – 4 लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!