मलकापूर : – स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये २१ ऑगस्ट रोजी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सोबती असलेल्या बैलांची विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने सजावट करून शाळेत आणले. सणानिमित्त बैलांची पूजा करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण संस्कृती जपण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक सणांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरला.
