मलकापूर : – स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक ५ जुलै 2025 वार शनिवारला “आषाढी एकादशी निमित्त” दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वारकरी संप्रदायांच्या वेशभूशेत आलेले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर विठ्ठल नामाचा गजरामध्ये दुमदुमला. प्रथमता विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती व प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. एस एस खर्चे सर, नूतन विद्यालयाचे प्राचार्य बोरले सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सरीता पाटील मॅडम , शाळेचे पर्यवेक्षक श्री अमोल चोपडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.गणपती व विठ्ठलाच्या आरतीने दिंडीची सुरुवात झाली. दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी पावली,फुगडी, लेझीमची विविध प्रात्यक्षिक करून लोकांचे मन जिंकली.दिंडी सोहळा शाळेपासून गांधीनगर विठ्ठल मंदिर राधे हॉटेल व बुलढाणा रोड वरून शाळेमध्ये आल्यानंतर शाळेतील इयत्ता नववीतील विद्यार्थी ह.भ.प. प्रेम भिका चांदेलकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारुडाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण ,पाणी आडवा पाणी जिरवा, मोबाईल मुळे विद्यार्थ्यांच्या जीवना होणारे विपरीत परिणाम या माध्यमातून जनजागृती केली. दिंडी सोहळ्यामध्ये श्री अमोल चोपडे सर, प्रशांत खर्चे सर, ऋषिकेश बाळापुरे सर, बळीराम इंगळे सर सौ अनुराधा इंगळे मॅडम,यांनी विविध अभंगाचे गायन करून दिंडीत शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संचालन सौ.उंबरकर मॅडम व राणे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील क्रीडा शिक्षक आकाश लटके सर व सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.