मलकापूर – महाशिवरात्रीनिमित्त श्री शाळू माता मित्र मंडळ, माता महाकाली नगर, मलकापूर यांच्या वतीने शिव मंदिर, सम्राट व्यायामशाळेजवळ येथे भव्य फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मा. नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या हस्ते महादेवाला पुष्प अर्पण करून आरतीने झाली. त्यानंतर सकाळपासूनच मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना तब्बल दीड क्विंटल फराळाचे वाटप करण्यात आले. या पवित्र सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण झाला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शाळू माता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.