Headlines

कोलते इंजिनिअरिंगच्या एनएसएस शिबिराने ‘सात दिवस, सात संकल्प’ मोहिमेने धरणगावात केला सामाजिक सेवेचा महायज्ञ!

 

मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष सात दिवशीय श्रम संस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जि. प. प्राथमिक मराठी शाळा धरणगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे डॉ अमित चौधरी व डॉ सुहास खंगार यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ युगेश खर्चे,आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, गावातील प्रमुख प्रमोद पाटील, उमाकांत चौधरी, एन एम झाल्टे साहेब, तेजस पाटील, धरणगाव शाळेचे मुख्याध्यापक पी टी पाटील, गावचे पोलीस पाटील, जितेंद्र पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यकारी अधिकारी प्रा. सचिन बोरले व गावकरी रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. अमित चोधरी व डॉ सुहास खंगार यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी ग्राम विकासाचे महत्व विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना पटवून दिले. डॉ युगेश खर्चे सर यांनी शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्व समावेशक विकास साध्य होतो याबद्दल मार्गदर्शन केले . सात दिवसांच्या निवासी शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तप्रियता येते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. व्यक्ती विकासाचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असे मनोगत प्रा. रमाकांत चौधरी यांनी केले. यावेळी सर्वांनी श्रमसंस्कार शिबिराला शुभेच्छा देऊन स्वयंसेवकांना सुंदर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजक कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी प्रास्ताविकामध्ये या विशेष शिबिराचे नियोजन आणि उद्देश सांगितले सात दिवसाच्या उपक्रमाचा आराखडा स्पष्ट केला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन स्वयंसेविका साक्षी देशमुख हिने केले.

सात दिवशीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी किसान कार्ड जनजागृती, ग्रामस्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, झाडे लावा झाडे जगवा, शाळा बाह्य सर्वे, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणी अडवा पाणी जिरवा, ग्रो ग्रीन कॅम्पनिंग, सेव्ह एनर्जी, आजाराविषयी जणजागृती, स्वच्छ भारत सुंदर भारत, विकसित भारत सशक्त भारत, महिला सक्ष्मीकरण असे अनेक उपक्रम घेण्यात आले.

शिबिराच्या बौद्धिक सत्रात प्रा.रमाकांत चौधरी व प्रा पांडुरंग चोपडे यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी युथ फॉर भारत व डिजीटल साक्षरता यावर मार्गदर्शन केले . दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी बौद्धिक सत्रात मलकापूर येथील माननीय डॉ नितीन बऱ्हाटे त्यांनी आरोग्य मार्गदर्शन व विजय राणे यांनी डिजिटल सेवा याबद्दल मार्गदर्शन केले. बौद्धिक सत्रात दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी मलकापूर येथील तहसीलदार मा. राहुल तायडे सर संविधान व वंदे मातरम याबद्दल मार्गदर्शन केले. दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी बौद्धिक सत्रामध्ये मलकापूर ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा संदीप अंबादास काळे यांनी बेटी बचाव बेटी पढाओ व महिला व मुलांसंबंधी अपराध यावर मार्गदर्शन केले.

दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी समाजसेविका उषा वनारे , उन्नत भारत अधिकारी प्रा.अंकुश नारखडे, प्रा आचल गोळे, प्रा भाग्यश्री नारखडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये किसान कार्ड जनजागृती, जलसंवर्धन, बेटी बचाव बेटी पढाओ, शिव्या मुक्त समाज अभियान याबद्दल जनजागृती रॅली काढण्यात आली.

दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशासकीय डीन आय क्यू सी अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनात निरोप समारंभ पार पाडला. दुपारी तीन वाजता सर्व स्वयंसेवकांनी शिबिराचा निरोप घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!